प्रामाणिक रिक्षा चालक प्रदीप चिंचकर यांचे होत आहे कौतुक ...
प्रामाणिक रिक्षा चालक प्रदीप चिंचकर यांचे होत आहे कौतुक ...
पनवेल / वार्ताहर : - आज दि.३ रोजी रिक्षा चालक प्रदिप चिंचकर हे शिवाजी चौक सेक्टर १० येथे खानदेश हॉटेल समोरून जात असताना त्यांना एक अनोळखी पर्स सापडली त्या पर्समध्ये रोख रक्कम ६०,००० , तीन ग्रॅम सोन्याची वस्तू व एक मोबाईल असा ऐवज होता ती पर्स घेऊन श्री प्रदीप चिंचकर ताबडतोब खांदेश्वर पोलीस स्टेशनला गेले, पर्समध्ये मोबाईल वाजत असताना पोलिसांनी फोन उचलला तो फोन श्रीमती सुमन गुरव सेक्टर ११ मंगलमूर्ती येथील रहिवासी यांचा होता, त्या बोलल्या कि माझी पर्स हरवली त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्याना पोलिस स्टेशनला बोलवून सदरच्या पर्स ची ओळख पटवून आणि रोख रक्कम त्यांना परत केली आणि खांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  श्री कोकाटे  यांनी प्रदीप चिंचकर यांच्या प्रामाणिक पदाबद्दल त्यांचा जाहीर सत्कार केला यावेळी  सर्व रिक्षावाल्यां तर्फे व खांदा कॉलनी येथील सर्व रहिवाशी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Comments