तीन मुलांसह विवाहिता बेपत्ता..
तीन मुलांसह विवाहिता बेपत्ता...
पनवेल, / दि.2  (संजय कदम) ः आपल्या तीन मुलांसह एक विवाहिता बेपत्ता झाल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
करंजाडे गाव येथील श्री गणेश कृपा बिल्डींगमध्ये राहणारे सतीशकुमार गौंड यांची पत्नी नंदिनीदेवी (25) रंग गोरा, चेहरा उभट, उंची 5 फूट, अंगाने सडपातळ, केस काळे लांब, डोळे घारे, डाव्या हातावर एस आणि एन असे गोंदलेले आहे. तीला भोजपुरी भाषा अवगत असून, तिच्या अंगात पंजाबी ड्रेस, पायात चप्पल सोबत तीन मुले त्यातील मोठा मुलगा समर वय वर्षे 9 रंग सावळा, चेहरा गोल, उंची 4 फूट, अंगाने सडपातळ, अंगात पॅन्ट शर्ट घातलेला आहे. मुलगी परी वय 6 वर्षे अंगाने मध्यम, रंग गोरा, चेहरा उभट, उंची 3 फुट, केस काळे, डोळे घारे, अंगात फ्रॉक घातलेला आहे व मुलगा अंश वय 3 वर्षे, रंग गोरा चेहरा गोल, उंची 2.5 फुट, अंगाने सडपातळ, केस काळे, डोळे काळे, दोन्ही हातात चांदीचे कडे असून अंगात हाफ पॅन्ट व शर्ट घातलेला आहे. या तिघांबद्दल कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा 8779749696 किंवा पोलीस नाईक  वाय.एम.म्हात्रे यांच्याशी संपर्क साधावा.
फोटो ः बेपत्ता आईसह तीन मुले
Comments