देव दर्शनासाठी आलेला इसम बेपत्ता...
देव दर्शनासाठी आलेला इसम बेपत्ता
पनवेल, दि.22 (संजय कदम) ः पनवेल जवळील मानघर येथील श्री क्षेत्र अक्षयधाम मंदिर येथे देवदर्शनासाठी आलेला इसम बेपत्ता झाल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
बाळकृष्ण दिगंबर धोत्रे (36) असे या इसमाचे नाव असून उंची 5 फुट 5 इंच, रंग गव्हाळ, डोक्यासमोरील भागाला टक्कल, कपाळावर उजव्या भुईच्यावर मोठा तिळ आहे. त्याच्या अगात पांढर्‍या रंगाचा शर्ट व त्यावर काळ्या रंगाचा जॅकेट व राखाडी रंगाची पॅन्ट घातलेली आहे. सोबत मोबाईल फोन आहे. त्याला मराठी भाषा अवगत आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पो.ना.विष्णू गावडे यांच्याशी संपर्क साधावा.


फोटो ः बेपत्ता बाळकृष्ण धोत्रे
Comments