दिशा महिला मंच आयोजित दिशा सौंदर्यसम्राज्ञी सौंदर्य स्पर्धा उत्साहात संपन्न
दिशा महिला मंच आयोजित दिशा सौंदर्यसम्राज्ञी सौंदर्य स्पर्धा उत्साहात संपन्न

पनवेल / वार्ताहर  : - दिशा कल्चरल इव्हेंट्स प्रस्तुत दिशा महिला मंच आयोजित दिशा सौदर्यसम्राज्ञी या सौदर्यस्पर्धेचे आयोजन कामोठे येथे 26 फेब्रुवारी रोजी आगरी हॉल येथे करण्यात आले होते. चुल आणि मुलं बाजूला सारून आपल्या अस्तित्वाला पंख मिळावे तसेच आपले गुण व कौशल्य दाखवण्यासाठी प्रत्येक 'ती' च्यामध्ये एक सुंदरता दडलेली असते तीला सिद्ध करण्यासाठी या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण 29 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या निलिमा सहाणे 1st रनर अप ठरल्या पूनम शेलार व 2nd रनर अप ठरल्या शमिका जाधव.तसेच 10 महिलांना टायटल विनर ने ही सन्मानित करण्यात आले.धर्मेश कडू, श्रुणाल जाधव व नंदिता परिडा यांनी कार्यक्रमाचे परीक्षण केले स्पर्धाकांनी ही संधी समजून स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत घेतली होती.
मातोश्री हॉस्पिटलचे डॉ स्नेहलता बाळासाहेब खडबडे, शिवश्री सचिन लावंड, समाजसेविका डॉ रुक्मिणी अर्जुन,समाजसेविका रेणुका डिसुजा, मिना खाकी पावडरचे CEO मंदार पोतदार, शिवश्री सचिन लावंड, दिलिप पाटील, शाम कुलथे, जयकुमार डिगोले, रांगोत्सव सेलेब्रेशन, श्रीजिता बॅनर्जी, पल्लवी गायकवाड यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. ज्ञानेश्वर बनगर, विद्या घारे या कार्यक्रमास पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
मिना खाकी कंपनी कडून उपस्थित मान्यवर व विजेत्यांना गिफ्ट ही देण्यात आले.तृतीय पंथीयांविषयीचा समाजाचा असणारा दृष्टिकोन दूर व्हावा व माणूस म्हणून त्यांच्याबरोबर माणसासम वागूयात असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. पाहुण्यांनकडून कौतुक होत दिशा व्यासपीठाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा ही मिळाल्या. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती यांनी केले तर आभार प्रदर्शन खुशी सावर्डेकर यांनी केले.ती च्या अस्तित्वाला पंख देण्यासाठी अशा विविध स्पर्धांचे आयोजन नेहमीच दिशा व्यासपीठामार्फत केले जाईल असे उपाध्यक्ष विद्या मोहिते यांनी सांगितले आयोजक निलम आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा उत्तमरित्या पार पडली.
Title Winner 
सौ.कल्याणी ठाकरे -Best Costume
सौ.वैशाली मोरे - Best m
सौ.मंजुषा दिलीप कदम ..Best Walk
सौ.रेश्मा शिनारे - Best Eye 
सौ.आलका चौधरी - Best Skin
सौ.माया फापाळे - Best Behaviar
सौ. कावेरी थोरात - Best personality
सौ.स्नेहल चेलेकर - Best Photogenik
सौ. निवेदिता बारापात्रे -Best Confidance
सौ.मनिषा शिंदे  -best smile
Comments