शिवसेना पनवेल शहर आयोजित "व्हाईस ऑफ पनवेल" आज महाअंतिम फेरी...
शिवसेना पनवेल शहर आयोजित "व्हाईस ऑफ पनवेल" आज महाअंतिम फेरी...
पनवेल / वार्ताहर : -  शिवसेना महानगर संघटक माजी नगरसेवक प्रथमेश सोमण यांच्या संकल्पनेतील चला निवडूया पनवेलकरांचा .... व्हाईस ऑफ पनवेलची आज महाअंतिम फेरी  होत आहे. कार्यक्रमाचे आयोजन पनवेल शहर शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.
       महाअंतिम फेरी शनिवार दि.१२ फेब्रुवारी २०२२ रोजी पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सायं .४.३० वाजता होत असून या महाअंतिम फेरीसाठी सुप्रसिद्ध पार्श्वगायक व संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत .
      या कार्यक्रमाअंतर्गत ९ युवा पनवेलकर गायकांचे धमाकेदार सादरीकरण, संगीत क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार , प्रेक्षकांच्या मतदानाने दिला जाणारा " व्हाईस ऑफ पनवेल " हा विशेष पुरस्कार, त्याचप्रमाणे दादर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाची प्रतिकृती यावेळी सादर केली जाणार आहे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. तसेच पनवेलचे प्रख्यात डॉ. गिरीश गुणे व इतर मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
Comments