काटेरी बोरीच्या झाडाखाली आढळला मृतदेह..
काटेरी बोरीच्या झाडाखाली आढळला मृतदेह

पनवेल, दि.16 (संजय कदम)- काटेरी बोरीच्या झाडाखाली एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून तिच्या नातेवाईकांचा शोध खारघर पोलिस करीत आहेत.

              खारघर रेल्वे स्टेशन ते सिबीडी रेल्वे स्टेशन दरम्यान पोल क्र.- 39/20 पासून 10 फूट अंतरावर असलेल्या काटेरी बोरीच्या झाडाखाली एका 35 ते 40 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. महिलेची उंची अंदाजे 5 फूट, अंगावर लाल रंगाची पॅंट व त्यावर लाल रंगाचा पंजाबी टॉप व त्यावर लाल रंगाचा टीशर्ट घातला आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास खारघर पोलिस ठाणे किंवा पोलिस उपनिरीक्षक एन.एल बेलदार यांच्याशी संपर्क साधावा.
Comments