खारघर परिसरात सराईत मोबाईल चोरी करणारा गुन्हेगार गजाआड..
खारघर परिसरात सराईत मोबाईल चोरी करणारा गुन्हेगार गजाआड
पनवेल, दि.21 (संजय कदम) ः खारघर परिसरात सराईत मोबाईल चोरट्यास खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या अटकेमुळे मोबाईल चोरीसह चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
खारघर येथे राहणारे विनोद शंकरराव चाटे , वय - 38 वर्षे हे सकाळी 0 9 : 15 वा.चे सुमारास खारघर , सेक्टर 27 , रांजणपाडा ते गुरूद्वारा रोडवर पायी चालत असताना आरोपी काशिम मुक्तार दराणी उर्फ छोटा कासीम उर्फ तलब (22 रा.आंबिवली) याने त्याच्याबरोबर असलेल्या इसमांशी संगनमत करुन काळया रंगाच्या पल्सर मोटार सायकलवरून पाठीमागुन येवुन फिर्यादीचे हातातील 60,000 / - रु किंमतीचा मोबाईल जबरीने हिसकावून चोरून पळुन गेल्याचे तक्रारीवरुन खारघर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . नमुद गुन्हयांचे अनुषंगाने अशा प्रकारे मोबाईलची जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपीचा शोध घेत असताना मिळालेल्या माहितीनुसार ठाणे कारागृहात अटकेत असलेला आरोपी नामे काशिम मुक्तार दराणी उर्फ छोटा कासीम उर्फ तलब वय 22 वर्षे रा . रूम नंबर 04 पाटीलनगर , गणेश चाळ , अंबिवली ता . कल्याण याचा ताबा घेवुन कौशल्यपुर्वक तपास केला असता नमुद गुन्हयातील मोबाईल चोरी आरोपीने केल्याबाबत माहिती दिल्याने त्यास अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन फिर्यादीचा चोरी केलेला 60,000 / - रू किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, पोलीस सह आयुक्त डॉ जय जाधव, शिवराज पाटील, परीमंडळ 2, पनवेल , सहा.पोलीस आयुक्त, भागवत सोनावणे, पनवेल विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि. संदीपान शिंदे, सपोनि मानसिंग पाटील, पोहवा बाबाजी थोरात, पोना प्रशांत जाधव, धनवटे, पोशि शिंगाडे, पोहवा वैद्य यांनी सदरची कामगीरी केली आहे.
फोटो ः खारघर पोलिसांनी हस्तगत केलेला मोबाईल फोन
Comments