पनवेल जिल्हा महिला काँग्रेस आयोजित हळदी- कुंकू समारंभ उत्साहात संपन्न..
पनवेल जिल्हा महिला काँग्रेस आयोजित हळदी- कुंकू समारंभ उत्साहात संपन्न
पनवेल / (अनिल कुरघोडे)  : - पनवेल जिल्हा महिला काँग्रेस व अनुसूचित जाती महिला विभाग यांच्या वतीने हळदी- कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व महिलांना वाण म्हणून भेट वस्तू  देण्यात आल्या.

सदर कार्यक्रमास पनवेल जिल्हा अध्यक्ष आर सी घरत व पनवेल ब्लॉक अध्यक्ष लतीफ शेख यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तसेच पनवेल तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी, महिला तालुका अध्यक्षा सपनाताई मुंगाजी, जेष्ठ नेत्या अंजलीदेवी पालकर, प्रेमा अपाजी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

त्याचप्रमाणे सर्व जिल्हा कार्यकारणी आणी ब्लॉक महिलां अध्यक्षा तसेच महिला पदाधिकारी व बचत गटाचे पदाधिकारी उपस्थित होते, त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

कार्यक्रमाचे नियोजन पनवेल जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा निर्मला म्हात्रे व अनुसूचित जाती पनवेल महिला अध्यक्षा माया अहिरे यांनी केले होते.
Comments