पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने संत गाडगेबाबा यांना करण्यात आले अभिवादन..
पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने संत गाडगेबाबा यांना करण्यात आले अभिवादन

 पनवेल दि.२३ / वार्ताहर : - राष्ट्रसंत शिरोमणी गाडगे बाबा यांची 23 फेब्रुवारी ही जयंती.पनवेल शहर जिल्हा काँग्रेस च्या वतीने संत गाडगे बाबा यांना अभिवादन करण्यात आले.आधुनिक काळातील महान संत,स्वच्छ भारताचे प्रणेते संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महान कार्याचे बाबत उपस्थितांना अवगत करण्यात आले.यावेळी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष भाई आर सी घरत,सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड,पनवेल अर्बन को ऑप बँकेचे उपाध्यक्ष अरविंद सावळेकर,रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे,माजी नगरसेवक लतिफ शेख,संत गाडगे बाबा यांचे नातू राहुल जानोरकर,सिटी बेल समूह संपादक विवेक पाटील,मंदार दोंदे, सोसायटी किंगडम चे व्यवस्थापकीय संचालक वैभव सोनटक्के, महेश साळुंखे,नवीन पनवेल विभाग अध्यक्ष पूजा मोहन,नवीन पनवेल युवक काँग्रेस अध्यक्ष मर्फी म्हसकर, ॲड अरुण कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments