ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स नवी मुंबई यूनिटचा शुभारंभ संपन्न..
ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स नवी मुंबई यूनिटचा शुभारंभ संपन्न..
पनवेल / प्रतिनिधी : - ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स यूनियनच्या नवी मुंबई यूनिटचा शुभारंभ यूनियन अध्यक्ष संजय वासुदेव पवार यांनी श्रीफळ वाढवून केला. डीन शिपिंग अँड ऑफशोर मॅनेजमेंट चे कामगार आज यूनियन मध्ये सामील झाले आणि ११० कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.
यूनिटचे धोरण स्पष्ट करताना यूनियन अध्यक्षानी सांगितले की बेरोजगार हाताना काम हे प्रमुख कारण आणि त्याची सुरक्षा, तसेच कामगार हक्कांचे कुठे ही उल्लंघन होवू नये. वैश्विक संकटातून बाहेर पडत असताना रोजगार उपलब्ध करून देणे.
या प्रसंगी यूनियन कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे, खजिनदार शितल मोरे, उपाध्यक्ष सुनील भोसले, उपाध्यक्ष सुरेश चौधरी, सरचिटणीस बंटी राणे, संघटक शमिका गवळी, संयोजिक स्वाती पाटील, नवी मुंबई पदाधिकारी रोशन कोळी, अक्षय कोळी, तुषार डिकुळे आणि यूनियन चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments