7 लाख रूपये किंमतीच्या गाडीची चोरी
पनवेल दि.04 (वार्ताहर): 7 लाख रूपये किंमतीची गाडी खांदेश्वर ओनर्स असोसिएशन से.-1 नवीन पनवेल याठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर उभी करून ठेवली असता चोरी झाल्याची घटना घडली आहे.
कपिल फडतरे (वय-32) यांनी त्यांची 7 लाख रुपये किंमतीची सफेद रंगाची मारूती सुझुकी बलेनो गाडी क्र.-एमएच 46 बीके 9886 हि उभी करून ठेवली असता सदर गाडी चोरून नेण्यात आल्याने याबाबतची तक्रार खांदेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक निलेश पोळ करीत आहेत.