अंमली पदार्थ विरोधी कक्ष पथकाने केला तळोजा परिसरातून जवळपास 5 लाख 89 रुपयांचा साठा हस्तगत..
अंमली पदार्थ विरोधी कक्ष पथकाने केला तळोजा परिसरातून जवळपास 5 लाख 89 रुपयांचा साठा हस्तगत

पनवेल दि.08 (वार्ताहर): अंमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखेच्या पथकाने तळोजा परिसरातील शिळफाटा येथून जवळपास 5 लाख 89 रुपयांचा अंमली पदार्थ, रोखरक्कम व इतर ऐवज असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.
          अमिन जाल मोहम्मद खान व बदरली इर्शाद अहमद शेख यांच्याकडे मेथाक्युलॉन हा अंमली पदार्थ त्यांच्याकडे असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखा यांना मिळताच वपोनि बी.एस. सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय शिंगे, पोलिस हवालदार रमेश उटगीकर आदींच्या पथकाने रूबी मार्केट गेटजवळ गुरूदत्त देव मंदिरासमोर छापा टाकून सदर मालाची विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या या दोघा इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडूनजवळपास 5 लाख 89 रुपयांचा अंमली पदार्थ, रोखरक्कम व इतर ऐवज असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्याची नोंद तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी "आम्ही लढणार..!! आम्ही जिंकणार..!!" असा स्टिकर लावून महापालिका लढ्याच्या मोहिमेची केली सुरुवात...
Image
एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांचे आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले सांत्वन ....
Image
शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न...
Image
वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन पनवेल तालुका पोलीस ठाण्याने उभारले सूचना फलक...
Image
ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते व जुने विजेचे खांब त्वरित बदलण्याची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या युवासेने तर्फे पनवेल महानगरपालिकेकडे मागणी..
Image