कळंबोली शहर ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षपदी जयदास पाटील यांची नियुक्ती..
कळंबोली शहर ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षपदी जयदास पाटील यांची नियुक्ती
पनवेल / प्रतिनिधी : - महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या मान्यतेनुसार व पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने कळंबोली शहर ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षपदी जयदास वसंत पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल सोमवार दि.१३/१/२०२२ रोजी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष आर.सी. घरत यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.

सदर काययक्रमास रायगड जिल्हा यवुक  काँग्रेस अध्यक्ष हमेराज नाथा म्हात्रे, पनवेल शहर जिल्हा
काँग्रेस सरचिटणीस (व्यवस्थापन व नियोजन ) मल्लीनाथ गायकवाड, पनवेल शहर जिल्हा महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे, डॉ. राजेश घरत, पनवेल विधानसभा यवुक अध्यक्ष विश्वजित पाटील, नवीन पनवेल शहर अध्यक्ष राहुल जाणोरकर, सुभाष गायकवाड यांनी नवनियुक्त अध्यक्ष जयदास पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
Comments