रंजना सडोलीकर यांच्या प्रयत्नाने शिवसेनेचा पुलाखालच्या शाळेसाठी पुढाकार
पनवेल दि.13 (वार्ताहर)- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिटिझन्स् युनिटी फोरम अर्थात ’कफ’ या संस्थेच्या रंजना सडोलीकर यांनी, आसूडगाव, पनवेलच्या ब्रीजखालच्या शाळेची व्यथा, स्वतः पुढाकार घेऊन, शिवसेनेचे खासदार अप्पासाहेब बारणे यांच्या कानावर घातली. त्यांनी तातडीने हे काम राकेश गोवारी, (शिवसेना, कामोठे शहर प्रमुख) व कल्पेश भालेराव (शिवसेना शाखा प्रमुख, कामोठे शहर) यांना पूर्ण करण्यास सांगितले.
या सर्वांनी मिळून ओपन एज्युकेशनच्या या ब्रिज खालच्या शाळेला भेट देऊन स्थळाची पाहणी करून, समस्या जाणून घेतल्या. या गरीब मुलांच्या भविष्यासाठी योग्य उपाय योजना व मुलांच्या सुरक्षितते साठी योग्य ते निर्णय घेऊ असे तेथील शिक्षिका अनिता कोलते मॅडम यांना त्यांनी आश्वासित केले. तसेच राकेश गोवारींतर्फे मुलांना चॉकलेट वाटप करण्यात आले. आश्वासनानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवातही झाली.
फोटोः ब्रिज खालची शाळा