मराठी भाषा वापरासंबंधीच्या तक्रारी व निवारणासाठी मराठी भाषा समितीमध्ये पनवेल आयुक्तांना स्थान..
मराठी भाषा वापरासंबंधीच्या तक्रारी व निवारणासाठी मराठी भाषा समितीमध्ये पनवेल आयुक्तांना स्थान 

पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः प्रशासकीय कामकाजात मराठी भाषा वापरासंबंधीच्या तक्रारी व निवारणासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा समिती स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अधिनियम 2021, अधि सूचनेनुसार  या अधिनियमातील तरतूदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच प्रशासकीय कामकाजात मराठीचा वापर न करण्यासंदर्भात प्राप्त होणार्‍या तक्रारींची चौकशी करुन तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील केंद्रीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका, विमा कंपन्या, रेल्वे तसेच अन्य केंद्रीय आस्थापना या सर्व कार्यालयात मराठी भाषेचा वापर करण्यात येतो किंवा कसे याबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व मराठी भाषेसंदर्भातील उपक्रम राबविण्यासाठी मराठी भाषा समिती गठीत करण्यात आली असून पनवेल महापालिकेच्या आयुक्तांना यात स्थान देण्यात आले आहे. अध्यक्षपदी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर हे असून उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील हे सदस्य सचिवपदी आहेत. समितीचे सदस्य म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी  अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पनवेल महानगरपालिका आयुक्त, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), श्री.मकरंद प्रभाकर बारटक्के, मु.पो.ता.रोहा, श्रीमती सुजाता पाटील, मुख्याध्यापिका, सृजन विद्यालय, कुरुळ अदींची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती या समितीचे सदस्य सचिव उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी दिली आहे.

कोट
प्रशासकीय कामकाजात मराठीचा वापर न करण्यासंदर्भात प्राप्त होणार्‍या तक्रारींची चौकशी करुन तक्रारींचे निवारण करण्यासाठी  कार्यक्षेत्रातील केंद्रीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका, विमा कंपन्या, रेल्वे तसेच अन्य केंद्रीय आस्थापना या सर्व कार्यालयात मराठी भाषेचा वापर करण्यात येतोय किंवा नाही या संबंधी तक्रारींचे निवारण करण्याचे काम या समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
गणेश देशमुख 
आयुक्त पनवेल महानगरपालिका
Comments