दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण...
दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

पनवेल, / दि.11 (वार्ताहर) ः तळोजा परिसरातील रोहिंजण गाव व नावडे गाव या परिसरात राहणार्‍या दोन 16 वर्षीय अल्पवयीन मुलींना फुस लावून अपहरण केल्याची घटना घडली आहे.
रोहिंजण गाव या ठिकाणी 16 वर्षीय मुलीला तिच्या राहत्या घरातून कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून अपहरण केले आहे. सदर मुलगी अंगाने मजबूत, रंग सावळा, उंची 5 फूट, चेहरा गोल, केस काळे मध्यम वाढलेले, डोळे काळे असून अंगात पंजाबी हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे व तिला हिंदी भाषा अवगत आहे. याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे सपोनि सोपान नांगरे यांच्याशी संपर्क साधावा. तर दुसर्‍या घटनेत नावडे गाव येथे राहणार्‍या 16 वर्षीय 5 महिने या मुलीचे सुद्धा कायदेशीर रखवालीतून फुस लावून अपहरण केले आहे. ती अंगाने मध्यम, उंची 4 फुट 8 इंच, रंग गोरा, चेहरा उभट, केस काळे वाढलेले, डोळे काळे असून तिला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे. तसेच तिच्या अंगावर गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस आहे. याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे सपोनि सोपान नांगरे यांच्याशी संपर्क साधावा.
Comments