रिक्षा चालकाच्या मुलींने किक-बॉक्सिंग स्पर्धेत मिळवले सुवर्ण पदक..
रिक्षा चालकाच्या मुलींने किक-बॉक्सिंग स्पर्धेत मिळवले सुवर्ण पदक
पनवेल /प्रतिनिधी : रिक्षा चालक अरविंद मोकल यांच्या मुलींनी जिंकले सुवर्ण पदक पनवेल खांदा कॉलनी परिसरात रिक्षा व्यवसाय करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात मुलींना क्रीडा क्षेत्रात आवड असल्याने रिक्षा व्यवसाय करून जमेल तसें मद्दत करत प्रोत्साहन आपल्या मुलीला देत नुकतेच पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय किक-बॉक्सिंग स्पर्धेत खांदा काॅलनी सेक्टर १४ मध्ये राहणारे कुमारी. संयोगिता अरविंद मोकल हीने पाॅईंट फाईट या प्रकारात १ सुवर्ण पदक व किक-लाईट प्रकारात १ कास्य पदक जिंकले तसेच कुमारी. हर्षदा अरविंद मोकल हिने पाॅईंट फाईट या प्रकारात १ सुवर्ण व लाईट-काॅन्टॅक प्रकारात १ सुवर्ण पदक जिंकले सदर मुली खांदा काॅलनी मध्ये प्रशिक्षक चिंतामणी मोकल सर यांच्या कडे प्रशिक्षण घेत आहेत वाको इंडिया
राष्ट्रीय किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप 2021 (केडेड, ज्युनियर आणि सीनियर) पुणे महाराष्ट्र
तारीख :- 27 ते 30 डिसेंबर 2021
रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. 
या स्पर्धेत संपूर्ण देश भरातून १२०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, या मध्ये रायगड संघाने एकूण  
२५ सुवर्ण पदक, 
१२ रोप्य पदक, 
१३ कास्य पदकांची कमाई केली त्या बद्दल 
वाको महाराष्ट्र असोसिएशन चे उपाध्यक्ष व रायगड किकबॉक्सिंग चे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर सर, राष्ट्रीय स्पर्धचे आयोजक संतोष म्हात्रे सर, चिंतामणी मोकल सर, निलेश भोसले सर, प्रशांत गांगुर्डे सर, युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया चे सर्व प्रशिक्षक व पालकांनी व  महाराष्ट्र रिक्षा पंचायत शाखा खांदा काॅलनी यांच्या कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
Comments