आयआयएफएल फायनान्सच्या तळोजा शाखेचे आ.प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन..
आयआयएफएल फायनान्सच्या तळोजा शाखेचे आ.प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल, दि.20 (वार्ताहर) ः आयआयएफएल फायनान्सच्या तळोजा शाखेचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. आयआयएफएल फायनान्सच्या देशभरात दोन हजारांहून अधिक शाखा आहेत. या वेळी आमदारांनी, परिसरातील नागरिकांना आर्थिक हातभार पुरवण्यासाठी आयआयएफएलने पुढाकार घेतला, तर नागरिकांना समाधान मिळेल, असे मत व्यक्त केले.
या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी, अभिमन्यू पाटील, युवा मोर्चाचे दिनेश खानावकर, निर्दोष केणी, पनवेल पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, बँकेचे सीजलन हेड संतोष भोसले, ब्रँच मॅनेजर सुरज भोईर, सुहास चाचे, जावेद मुलाणी, प्रशांत गायकर, संतोष साबत आदींसह पदाधिकारी, कार्यकत उपस्थित होते.


फोटो ः आ.प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
Comments