नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेनी,जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची सदिच्छा भेट घेऊन तब्येतेची केली विचारपूस..
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेनी,जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची सदिच्छा भेट घेऊन तब्येतेची केली विचारपूस
पनवेल / वार्ताहर :-   दि. ३ जानेवारी २०२२ रोजी मा.ना. एकनाथ शिंदे (नगरविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य.) खारघर सेक्टर-३६ येथे फूटबॉल मैदानाची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी शिरीष घरत (जिल्हाप्रमुख रायगड पनवेल) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली व प्रकृतीची विचारपूस केली. 

यावेळी सोबत मा. राजन विचारे (खासदर ठाणे), मा. बिबीन कुमार सिंह (नवी मुंबई पोलिस आयुक्त),  मा. मनोहरशेठ भोईर (मा. आमदार व जिल्हा प्रमुख उरण), मा. शिवराज पाटील  (पोलिस उपयुक्त परिमंडळ-२), कैलास शिंदे (सह व्यवस्थापक सिडको), बबन पाटील (शिवसेना सल्लागार), रामदास शेवाळे (महानगर प्रमुख),  विष्णु गवळी (जेष्ठ शिवसैनिक व समाजसेवक),  रामकृष्णशेठ घरत (उद्योजक), योगेश तांडेल (तालुका संपर्क प्रमुख), दिपक घरत (उपमहानगर प्रमुख), यतीन देशमुख (शहर प्रमुख नवीन पनवेल) डि.एन. मिश्रा (शहर प्रमुख कळंबोली), ज्ञानेश्वर भंडारी(उपशहर प्रमुख नविन), मनेश पाटील (विभाग प्रमुख खारघर), युवासेना उपजिल्हा अधीकारी अवचित राऊत आदि पदाधिकारी उपस्थित होते.
Comments