अपंग बांधवांना केले कृत्रिम पाय वाटप ; कळंबोली पोलिसांचा पुढाकार ..
अपंग बांधवाना केले कृत्रिम पाय वाटप ; कळंबोली पोलिसांचा पुढाकार 
पनवेल -- दुर्धर आजार किंवा अपघातामुळे आलेल्या अपंगत्वामुळे अनेकांना विविध समस्यांना तोंड देत परावलंबी जीवन जगावे लागते. यामुळे दिव्यांगांची होणारी मानसिकता लक्षात घेत सामाजिक बांधिलकी म्हणून कळंबोली पोलिस ठाणे, नवी मुंबई व ग्रामिण (जयपुर फुट), जामखेड जि. अहमदनगर आरोग्य प्रकल्प, यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार ता. 26 रोजी निल आश्रम वांगणी नेरे येथे प्रजासत्ताक दीना निमित्ताने कृत्रिम पाय वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपंगाना कळंबोली पोलिसांचा आधार मिळाला आहे.

यावेळी या कार्यक्रमाला शिवराज पाटील - पोलीस उपायुक्त, परिमंडळ, भागवत सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, पनवेल विभाग, रवींद्र दौडकर - वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल तालुका, परेश दवे - चेअरमन स्टील मार्केट, राहुल हजारे - डीडीएसआर, बिल्डर्स अॅण्ड डेक्लपर्स, उमा राणी - एमएनआर खुल, डायरेक्टर, विजय कक्कड - व्ही. एन. इलेक्ट्रॉनिक कळंबोली, व कार्यक्रमाचे आयोजक म्हणून कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील हे उपस्थित होते.

कुणाचा अपघातात, तर कुणाचा गंभीर आजारामुळे पाय निकामी झालेला. अशा अवस्थेतही जगण्याची, अपंगांमध्ये आहे. अशा जिद्द बाळगणाऱ्या अपंगांचा आधार बनून त्यांच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करण्याचे सत्कर्म कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी केला आहे. यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. ज्या अपंगाना गरज आहे, अशा अवयवाचे मोजमाप करून कृत्रिम पाय तयार करून बसविण्यात आले. शिबिरात शहरासह ग्रामीण भागातूनही अपंग बांधव सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच गरजूंना स्वावलंबी जीवन जगण्यास मोठा हातभार लागणार आहे.अशा प्रकारचा उपक्रम समाजाला खरी ताकद देणारे असल्याचे परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी शिबिरात आलेल्या दिव्यांगांना कृत्रिम अवयव प्रत्यारोपणासाठी मार्गदर्शन केले.

दिव्यांग बांधावच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न

अपंगत्वामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यामातून या अपंग बांधवाच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

- संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
कळंबोली पोलीस ठाणे
Comments