नवी मुंबई डाक विभागामार्फत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा...
नवी मुंबई डाक विभागामार्फत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
पनवेल / वार्ताहर :-  नवी मुंबई डाक विभागामार्फत पनवेल हेड पोस्ट ऑफिसच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डायरेक्टर ऑफ पोस्टल सर्विसेस, नवी मुंबई रीजन , श्रीमती सरण्या यु यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.  याप्रसंगी स्माइल्स फाउंडेशन यांच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या मुलांना 'बायजूस ई लर्नींग' ची मोफत सदस्यता प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे डाक विभागातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उत्कृष्टता प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमासाठी नवी मुंबई रीजनच्या डायरेक्टर पोस्टल सर्विसेस, श्रीमती सारण्या यु., नवी मुंबई डाक विभागाचे वरिष्ठ अधिक्षक डॉ अभिजित इचके, स्माईल्स फाऊंडेशनचे डॉ. धिरज आहूजा, श्रीमती उमा आहूजा आणि नवी मुंबई डाक विभागातील कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती होती.
Comments