४००० की.मी सायकल वरून जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी सायकल रायडिंग ; सई पाटील चे पनवेल मध्ये भव्य स्वागत..
४००० की.मी सायकल वरून जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी सायकल रायडिंग ; सई पाटील चे पनवेल मध्ये भव्य स्वागत 
पनवेल / वार्ताहर : - ठाण्याच्या बाळकूम मधील जलपरी म्हणून ओळखली जाणारी दहा वर्षाची सई पाटील ही चिमुकली काश्मीर ते कन्याकुमारी ४००० हजार की.मी. सायकलिंग रायडिंग  प्रवास करत  आहे . आज प्रत्येक गावातील शाळांमध्ये जलपरी, हवाई परी सई पाटील ही विश्वविक्रमी सायकल प्रवास दरम्यान सर्वांना संदेश देत आहे मुलगी वाचवा मुलगी शिकवा, स्त्री भ्रुण हत्या थांबवा, झाडे लावा झाडे जगवा प्रदूषण हटवा, पर्यावरण वाचवा ,सायकलचा वापर करा, असे विविध संदेश देत ती कश्मीर ते कन्याकुमारी हा सुमारे ४०००  किलोमीटरचा सायकल प्रवास आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वाद च्या बळावर विक्रमी वेळात निश्चितच पूर्ण करून एक वेगळाच विश्वविक्रम प्रस्थापित करेल असा विश्वास सई ने दर्शविला आहे.

सई हिचे पनवेल मध्ये भव्य स्वागत करत आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्तीत चारुशीला घरत माजी उपमहापौर , किशोर मोरे रायगड जिल्हा उपाध्यक्ष , शैलेश पाटील कोकण उपाध्यक्ष , हेमंत पाटील हॉटेल उद्योजक, जगदीश म्हात्रे जिल्हा सरचिटणीस, गंगाराम पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते ,वसंत मोर्बाळे सल्लागार पनवेल तालुका, जितेंद्र निंबाळकर पनवेल तालुका अध्यक्ष , हरिदास शेंडे ,प्रभा सिन्हा मॅडम
रूपालीताई शिंदे , शिवानी रावते ,मनीष पाटील
किशोर महाडिक, सुधीर पोपेटा आदी उपस्थित होते.
Comments