अज्ञात व्यक्तींकडून रात्री जाळला जातोय कचरा, कारवाईची मागणी..
अज्ञात व्यक्तींकडून रात्री जाळला जातोय कचरा,  कारवाईची मागणी
पनवेल, दि.30 (संजय कदम)- नवीन पनवेल परिसरात साठलेला कचरा अज्ञात व्यक्तीकडून रात्रीच्या वेळेस जाळला जात असल्याने त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. तरी अशा व्यक्तींविरूद्ध कारवाईची मागणी नवीन पनवेल मधील स्थानिक रहिवासी करीत आहेत.
          नवीन पनवेल येथील परिसरातील अनेक होर्डिंग पॉंड येथे फेरीवाले तसेच काही परिसरातील नागरिक रात्रीच्या वेळी कचरा टाकतात. सदर कचरा हा सिडको व महानगरपालिकेच्या माध्यमातून वेळोवेळी उचलला जातो व परिसर स्वच्छ ठेवण्यात येतो. मात्र काही जण हा जमलेला कचरा रात्रीच्या वेळी जाळत असल्याने हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते व दुर्गंधी सुद्धा सुटते. कचरा जाळण्यास बंदी असतानाही हा प्रकार केला जातो. तरी अशा व्यक्तींविरूद्ध संबंधित विभागाने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवासी करीत आहेत.       

फोटोः साठलेला व जाळलेला कचरा
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image