युवासेना कोर कमिटीच्या माध्यमातून माता-भगिनींना साड्यांचे वाटप..
युवासेना कोर कमिटीच्या माध्यमातून माता-भगिनींना साड्यांचे वाटप
पनवेल, दि.23 (वार्ताहर)- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने बबनदादा पाटील रायगड जिल्हाप्रमुख सल्लागार यांच्या आदेशाने तसेच रुपेशदादा पाटील युवा सेना कोर कमिटी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर विभाग प्रमुख प्र.क्र६ रोशन सुभाष पवार यांच्या कडून गरीब गरजू माताभगिनींना १०० साड्यांचे वाटप करण्यात आले.
       स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या २०%राजकारण ८०% समाजकारण ह्या विचारांना प्रेरीत होऊन कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी युवासेनेचे संकेत पाटील ,प्रकाश राजपूत ,शक्ती गायकवाड हे उपस्थित होते.
          

फोटोः रोशन सुभाष पवार गरजू माताभगिनींना साड्यांचे वाटप करताना
Comments