पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी भाजयुमोचां महाराष्ट्राच्या प्रवेश द्वार असलेल्या बांदा येथे महामृत्युंजय जप...
पनवेल / वार्ताहर : - देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे याकरिता महाराष्ट्राचे प्रवेशद्वार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा याठिकाणी बांदेश्वर मंदिर या जागृत देवस्थान ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने महामृत्युंजय जप करण्यात आला. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सहकार्यांसह श्री बांदेश्वरच्या चरणी साकडं घातलं आणि पंतप्रधानांची देशाच्या कल्याणासाठी आवश्यकता असल्याने त्यांना दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना केली.
भारताच्या पंतप्रधानांनी जगभरात एक कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख निर्माण केली आहे,आज जगाचा आपल्या देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे अशावेळी त्यांच्या कर्तृत्वाची आपण स्पर्धा करू शकत नाही म्हणून त्यांच्या बाबतीत काहीतरी घातपात घडवून आणण्याचा लाजीरवाणा प्रयत्न पंजाब काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आला होता.
काँग्रेसने असे हिन पातळीचे राजकारण करू नये, त्यांना ईश्वर सुबुद्धी देवो आणि नरेंद्र जी मोदी यांना दीर्घायुष्य लाभो याकरिता यावेळी प्रार्थना करण्यात आली.
याप्रसंगी सोबत प्रदेश सचिव अमृत मारणे, सुजित थिटे, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष भाई सावंत, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे व बांदा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.