युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मेल करताच २४ तासांत कारवाई ; शाळेने फी कमी करून परीक्षेस बसायला दिली अनुमती..
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मेल करताच २४ तासांत कारवाई ; शाळेने फी कमी करून परीक्षेस बसायला दिली अनुमती..

पनवेल / वार्ताहर : -  नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेत इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेल्या गुंजन ह्या विद्यार्थिनी ला गेल्या ७-८ महिन्या पासून शाळा फी साठी त्रास देत होती !
गुंजन चे वडील नसल्याने घरी हलाकीची परिस्थिती आहे, आई आणि मामा यांज कडून घर चालत असतांना ह्याच शाळेत घरातील २ मुले शिकत आहेत, सुरुवातीची फी दिलेली असतांना बाकी फी मध्ये शाळेने आई एकटी कमावते म्हणून फी मध्ये सवलत देण्याचे वचन दिले होते मात्र तसे न होता सरसकट फी भरण्यास सांगितले आणि फी भरली नाही तर उद्या होणाऱ्या १० वी च्या टेस्ट परीक्षेत बसता येणार नसल्याचे शाळेच्या प्रिन्सपल यांनी सांगितले, 
खूप विनवणी केल्या नंतर ही शाळा जुमानत नसल्याने शेवटी पालकांनी युवासेना प्रमुख, पर्यटन तथा पर्यावरण मंत्री यांना थेट मेल करून याबाबत तक्रार केली.
याची तातडीने दखल घेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रायगड व नवीमुंबई येथील काम पाहणारे युवासेनेचे सहसचिव रुपेश पाटील यांना युवासेना कार्यकारणी सदस्य साईनाथ दुर्गे यांच्या मार्फत आदेश दिले, लगेचच पालकांना भेटून सर्व प्रकार सहसचिव रुपेश पाटील यांनी जाणून घेतला व याबाबत थेट रायन ग्रुप च्या हेड श्रीमती आलीस मॅम यांना विचारला आणि हे प्रकरण तातडीने सोडविले नाही तर शाळेत आंदोलन करण्याचे सूतोवाच दिले.
दुसऱ्या दिवशी सकाळीच शाळेने पालकांना बोलावून परीक्षेचा फॉर्म भरून दिला व फी बाबत सवलत युवासेनेची मागणी मान्य केली.
७ महिन्याचा त्रासावर एक तक्रारी नंतर २४ तासांत न्याय मिळाला या बाबत पालकांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे व सह सचिव रुपेश पाटील यांचे आभार मानले.
कोविड नंतर असे अनेकांना आर्थिक संकट आले आहे अशावेळी शाळा किंवा कॉलेज किंवा इतर ठिकाणी त्रास असेल तर त्यांनी तातडीने रुपेश पाटील यांना संपर्क करावा असे आवाहन यांनी केले आहे .
Comments
Popular posts
बेलपाडा प्रकरणाची महसूल मंत्र्यांकडून दखल ; आमदार विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला गती...
Image
आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या निधीतून साकारलेल्या महर्षी वाल्मिकी समाज सभागृहाचे जयंतीदिनी लोकार्पण....
Image
भीमाशंकर येथील झाडांच्या विनाशाबद्दल पनवेलच्या निसर्ग प्रेमींची मूक निदर्शने...
Image
वैश्य युवा सामाजिक संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ; खोपोलीत विद्यार्थी गुणगौरव व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
Image
कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरे वाडीतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत ; पनवेलचे शिवसैनिक राहुल गोगटे यांचा पुढाकार
Image