कामोठे कॉलोनी फोरमच्या महिला शहराध्यक्ष पदी जयश्री झा यांची निवड...
कामोठे कॉलोनी फोरमच्या महिला शहराध्यक्ष पदी जयश्री झा यांची निवड...
पनवेल / वार्ताहर : - कामोठे कॉलोनी फोरमच्या विशेष कार्यकारणी सभेमधे जयश्री झा यांची महिला शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच नियुक्तीचे पत्र नगरसेविका लीना गरड अणि कामोठे कॉलोनी फोरमचे अध्यक्ष मंगेश अढाव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. जयश्री झा ह्या कामोठे कॉलोनी फोरम मधे सक्रिय असुन फोरमच्या प्रत्येक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. तसेच इतर सामजिक कार्यातही त्या नेहमीच अग्रेसर असतात. 
एका उच्चशिक्षीत महिलेकडे जबाबदारी सोपविल्यामुळे यापुढे कामोठे कॉलोनी फोरम कडून महिलांचे प्रश्न अजुन चंगल्या पद्धतीने सोडविले जातील असा विश्वास नगरसेविका अणि कॉलोनी फोरम अध्यक्षा लीना गरड ह्यांनी व्यक्त केला. जयश्री झा ह्यांना उत्तम सामजिक जाण असुन त्यांच्याद्वारे महिला सक्षमीकरण तसेच महिलांच्या हिताचे उपक्रम हाती घेतले जातील असा विश्वास फोरमचे अध्यक्ष मंगेश अढाव ह्यांनी व्यक्त केला.
यावेळी फोरमच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठीब तसेच महिला सक्षमीकरणासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत नवनियुक्त महिला शहराध्यक्ष जयश्री झा ह्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमा दरम्यान फोरम चे कार्य घराघरात पोहचण्यासाठी तसेच प्रत्येक सेक्टरमधील समस्या सोडविण्यासाठी विविध सेक्टर मधील 45 जणांची सेक्टर समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली.
Comments