सिडको अधिकाऱ्यांचा नावडे वसाहतीतील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ ; दुर्गंधीयुक्त सांडपाणी सोडले होल्डींग पोंड मध्ये..
सिडको अधिकाऱ्यांचा नावडे वसाहतीतील  नागरिकांच्या आरोग्याशी  खेळ ; दुर्गंधीयुक्त सांडपाणी सोडले होल्डींग पोंड मध्ये..
 
 
 पनवेल : सिडकोच्या कामोठे नोडमध्ये  येत असलेली नावडे सिडको वसाहत या वसाहतीत अजून पर्यंत सिडकोने आवश्यक त्या नागरी सुविधा दिलेल्या नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांचे हाल होत आहेत. त्याच्यावर कडी म्हणून  की काय? सिडकोने या वसाहतीचे दुर्गंधीत युक्त घाणेरडे सांडपाणी वसाहती लगत असलेल्या होल्डिंग पौंड मध्ये सोडले आहे. 
त्यामुळे येथील वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यामुळे प्रदूषण होण्याचाही मोठा धोका आहे. नावडे वसाहतीसाठी नागरिकांना सुविधा मिळाव्यात म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे सिडको प्रशासनाला आवश्यक तो निधी उपलब्ध असताना केवळ येथील सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे  येथील नागरिकांना आवश्यक या नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत येथील स्थानिक जेष्ठ समाजसेवक  यदुनाथ  पाटील  यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी व प्रदूषण नियंत्रण मंडल महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे.
     अगोदरच कोरोना महामारीच्या संकटाशी सामना करताना हतबल झालेल्या नागरिकांच्या आरोग्याशी सिडको अधिकारी यांनी  खेळू नये. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही याची दखल घेऊन कारवाई करावी अशी विनंती यदुनाथ पाटील यांनी या लेखी  तक्रारीत केली आहे.
Comments