भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेनेने केले अभिवादन...
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल येथील आंबेडकर भवनात जाऊन पनवेल शिवसेनेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळेस शिवसेनेच पदाधिकारी प्रविण जाधव (शहर संघटक), अनिल कुरघोडे (उपशहर संघटक), सुजन मुसलोंडकर (विभाग प्रमुख), प्रविण परमार, अमित माळी, श्रीमती रुही सुर्वे (शहर संपर्क संघटक), सौ. अर्चना कुळकर्णी (शहर संघटक), सौ. रेश्मा कुरुप (विभाग संघटक) आदी उपस्थित होते.
फोटो ः शिवसेनेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना.