गुन्हे शाखा कक्ष ३ ची धडक कारवाई ; ५३ लाख ७१ हजाराचा एम.डी.अंमली पदार्थ केला हस्तगत..
गुन्हे शाखा कक्ष ३ ची धडक कारवाई ; ५३ लाख ७१ हजाराचा एम.डी.अंमली पदार्थ केला हस्तगत

पनवेल,/ दि.31 (संजय कदम) ः गुन्हे शाखा कक्ष 3 पनवेलच्या पथकाने धडक कारवाई करीत तालुक्यातील नेरे वाजे रोडवर एका इसमास ताब्यात घेवून त्याच्याकडून जवळपास मारुती गाडीसह 53 लाख 71 हजार रुपये किंमतीचा मेथ्यॉक्युलॉन पावडर (एमडी) हा अंमली पदार्थ हस्तगत केला आहे.
तालुक्यातील शंकर मंदिर समोरील पिंपळाच्या झाडाजवळ नेरे-वाजे रोडवर एक इसम एमडी हा अंमली पदार्थ घेवून येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 3 चे वपोनि शत्रुघ्न माळी यांना मिळताच त्यांच्यासह पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर, वपोनि बी.एस.सय्यद, वपोनि पराग सोनावणे, सहा.पो.निरीक्षक तुकाराम कोरडे, सपोनि सागर पवार, पो.उपनिरीक्षक विजय शिंगे, पो.हवा.रवींद्र कोळी आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून आरोपी कलीम रफिक खामकर (39 रा.भुसार मोहल्ला, पनवेल) याला ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे असलेल्या एका प्लॅस्टीकच्या पिशवीमध्ये 50 लाखाचा एमडी हा अंमली पदार्थ तसेच सोबत त्याच्याकडे असलेली मारुती गाडी, मोबाईल फोन व रोख रक्कम असा मिळून जवळपास 53 लाख 71 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image