बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन रायगडची सर्व साधारण मिटींग संपन्न...
पनवेल / वार्ताहर : - रविवार दिनांक १२ डिसेंबर २०२१ रोजी बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन रायगड ची सर्व साधारण मिटींग रायगड अध्यक्ष प्रमोद भिगारकर यांच्या नेतृत्वात पार पडली. सदर वार्षिक सर्वसाधारण बैठकीत येत्या काळात घेण्यात येणाऱ्या रायगड श्री स्पर्धा, नवोदित बॉडीबिल्डींग स्पर्धेविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच रायगड जिल्ह्यातील महिला व पुरुष बॉडीबिल्डर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जास्तीत जास्त खेळाडू पाठविण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी असोसिएशन सर्वोत्तर प्रयत्न करेल असा ठराव करण्यात आला. भविष्यात बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन रायगड महाराष्ट्रात नाव अधोरेखीत करेल असा सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विश्वास दाखवला.
सदर प्रसंगी अध्यक्ष प्रमोद भिंगारकर,कार्याध्यक्ष मारुती अडकर सर (छत्रपती पुरस्कार विजेते ), उपाध्यक्ष किशोर देवधेकर सर, जॉईन्ट सेक्रेटरी किशोर नारकर,जॉईन्ट सेक्रेटरी सुनील नांदे, खजिनदार राजेश अनगत,ऑरगॅनयजर सेक्रेटरी जगदीश अगीवले, सल्लगार रवींद्र इथापे,
सल्लगार ऍड. शशिकांत मुंडे,सहखजिनदार राजेश थेटे,सदस्य रुपेश ठाकूर, महेश खरात, मयूर कदम आदी प्रमुख पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.