आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबीर संपन्न...
आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबीर संपन्न....
नवी मुंबई : महाराष्ट्र शासन, आदिवासी विभाग, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा चिंबीपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथे 5 डिसेंबर  2021 रोजी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी - विद्यार्थिनीसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर नवी मुंबईतील ऐरोली येथील फ्रीडम फॉर यु  सामाजिक संस्था आणि हंटमेंन इंटरनॅशनल प्रा.लिमिटेड यांच्या वतीने सुमारे 75 विद्यार्थिनी आणि 65 विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक असलेली औषधे देण्यात आली.  
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र एन. चौधरी आणि महिला अधीक्षिका माधुरी लोखंडे तसेच संस्थेचे सीईओ रवी कुमार,  डॉ. समिधा गोरे डॉ. विनोद शर्मा, यांनी  मुलांना विविध आरोग्याबाबत माहिती, स्वच्छता, आणि होत असलेले हवामान बदल, आणि आरोग्यबाबत घ्यायची काळजी, याविषयी मार्गदर्शन केले,  तर किशोरवयीन, विद्यार्थिनींना असलेल्या,आरोग्य बाबत समस्या, जाणून घेऊन त्याबाबत त्यांना विशेष माहिती,  युवा अवस्थेत उदभवणार्या समस्या,आणि त्यावरील निराकरण, अशी विशेष माहिती आणि काळजी याबाबत  किशोवयीन विद्यार्थीनीसाठी आरोग्य सत्र घेऊन  डॉ. समिधा गोरे यांनी मार्गदर्शन केले, तसेच मुलांना विटामिन, टॉनिक, प्रोटीन पावडर, आणि नोटबुक, कंपासबॉक्स, खाऊ म्हणून बिस्किटे, लक्स साबून प्रत्येकी विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले, तर विद्यार्थिनींना  सॅनिटरी नॅपकिन वितरण करण्यात आले. 
यावेळी उपस्थित मान्यवरांचे  स्वागत मुख्याध्यापक रवींद्र चौधरी यांनी केले तर स्त्री अधीक्षिका माधुरी लोखंडे यांनी शिबिराचे आयोजन केले, तर  कर्मचारी सुभाष देवकाते, दिगंबर गाडे, जाधव आरोग्य शिबिर यशस्वी करण्यास परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी आणि  विद्यार्थिनी यांनी मोठ्या संख्येने शिबिरास प्रतिसाद देऊन यशस्वी केले
Comments