तरुणीचे अपहरण...
तरुणीचे अपहरण...
पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना नावडे परिसरात घडली आहे.
अशोक झा यांची 17 वर्षीय मुलगी रंग गोरा, उंची अंदाजे 5 फुट 5 इंच, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, डोळे काळे, नाक सरळ केस काळे व लांब असून अंगात फिक्कट रंगा कुडता व फिक्कट खाकी रंगाचा पायजमा तसेच पायात लाल रंगाची सॅण्डल असून तिला हिंदी व मराठी भाषा अगवत आहे. तसेच तिच्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या बाजूच्या बोटावर तीळ आहे. 
तिचे अपहरण नावडे येथील महाविद्यालय परिसरातून करण्यात आले आहे. याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात देण्यात आली असून याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र कोंडे भ्रमणध्वनी 9422594539 येथे करावा.
Comments