जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून "आरोग्यसेवा आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर सुपूर्द..

जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून "आरोग्यसेवा आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत  दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर सुपूर्द..

पनवेल / वार्ताहर : - विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून "आरोग्यसेवा आपल्या दारी" हा उपक्रम राबवित असताना रमाकांत कुंभार या दिव्यांग बांधवांला व्हीलचेअरची आवश्यकता असल्याचे आरोग्य सेविकांना कडून समजले असता. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे  यांच्या हस्ते व्हीलचेयर रमाकांत कुंभार यांना सुपूर्द केली. यावेळी त्यांच्यासह संस्थेचे कार्यकर्ते व आरोग्य सेविका उपस्थित होत्या.
Comments