घरात चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोरट्यास प्रसंगावधानाने पकडले...
घरात चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोरट्यास प्रसंगावधानाने पकडले

पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः एका घरामध्ये चोरी करण्याच्या इराद्याने पहाटेच्या सुमारास घरात घुसलेल्या चोरट्यात घरातील जागृत नागरिकांना प्रसंगावधान राखून पकडले आहे व त्याला कामोठे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
कामोठे गावात राहणारे महादेव म्हसकर हे त्यांच्या पत्नी व मुलांसह राहतात. त्यांचा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय आहे. रात्रीच्या वेळेस ते घर बंद करून झोपले असताना एका अज्ञात चोरट्याने खिडकीवाटे त्यांच्या घरात आत प्रवेश केला व त्याच्या हालचाली वरुन घरात झोपलेल्यांना जाग आली व त्यांनी प्रसंगावधान राखून त्याला पकडले व आरडाओरडा केला. यावेळी आजूबाजूचे लोक सुद्धा त्यांच्या मदतीला येवून सदर चोरट्यास कामोठे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
Comments