सीकेटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची महापालिका मुख्यालयाला भेट...


सीकेटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची महापालिका मुख्यालयाला भेट...
पनवेल, दि.१ : पनवेल महानगरपालिका-निवडणूक विभागाच्या वतीने स्वीप २१– पद्धतशीर मतदार साक्षरता आणि निवडणुक सहभाग मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत सीकेटी महाविद्यालयाच्या निवडक विद्यार्थ्यांनी पनवेल महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाला नुकतीच भेट दिल. पद्धतशीर मतदार साक्षरता, निवडणुक आणि नोंदणी तसेच महापालिकेच्या कामकाजाबद्दल माहिती उपायुक्त विठ्ठल डाके यांनी विषद केली.

तसेच उपस्थित विद्यार्थ्यांनी महानगरपालिका व स्पर्धा परीक्षा संदर्भात प्रश्न विचारले, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे यांनी समर्पक उत्तरे दिली, सहभागी सर्व विद्याथ्यार्ना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 यावेळी निवडणूक विभाग सदाशिव कवठे, विजय चव्हाण, सीकेटी महाविद्यालयाचे प्राध्यापक  पारखले सर यांचे विशेष सहकार्य लाभले.
Comments