20 लाखांच्या ट्रकची चोरी...
20 लाखांच्या ट्रकची चोरी...

पनवेल, दि.13 (संजय कदम): 20 लाख रूपये किंमतीच्या टाटा कंपनीच्या 14 चाकी ट्रकची चोरी चालकाने केल्याची घटना पनवेल तालुक्यातील अजिवली गावाच्या हद्दीतील एचपी पेट्रोल पंपाच्या बाजूला घडली आहे.
               विनोद पवार यांच्या ट्रक क्र.एमएच 13 एएक्स 4109 यावर चालक म्हणून काम करणारा अजिम सलीमखी पठाण याने 20 लाख रूपये किंमतीचा 14 चाकी ट्रक सदर ठिकाणी उभा केला असता मालकाची फसवणूक करून त्याने तो ट्रक चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments