पनवेल महापालिकेला राष्ट्रपती पुरस्कारासाठी नामांकन जाहीर ; पनवेल तालुका पत्रकार महासंघातर्फे आयुक्त गणेश देशमुख यांचे अभिनंदन....
पनवेल महापालिकेला राष्ट्रपती पुरस्कारासाठी नामांकन जाहीर ; पनवेल तालुका पत्रकार महासंघातर्फे आयुक्त गणेश देशमुख यांचे अभिनंदन....
पनवेल : रायगडसह कोकणात पहिल्या असलेल्या पनवेल महापालिकेला नुकताच राष्ट्रपती पुरस्कारासाठी नामांकन जाहीर झाले आहे, ही पनवेलवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे पनवेल तालुका पत्रकार महासंघाच्या वतीने महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. पनवेल तालुका महासंघाचे जेष्ठ सल्लागार सुनील पोतदार, जेष्ठ सल्लागार प्रमोद वालेकर यांच्या उपस्थितीत पनवेल तालुका महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांनी त्या संदर्भातील अभिनंदन पत्र आयुक्त गणेश देशमुख यांना दिले.
पनवेल महानगरपालिकेचे कामकाज विकासात्मक लोकाभिमुक आहे. आजही महापालिकेच्या माध्यमातून समाजाभिमुख घेतलेल्या विविध निर्णयामुळे महापालिका प्रशासनाच्या  कार्याचा ठसा जनमानसात उमटत आहे, पनवेल महापालिकेने स्वच्छता निर्मूलन, प्लास्टिक बंदी यासह अनेक लोकोपयोगी उपक्रम मोठ्या हिरीरीने पूर्णत्वास नेले आहेत, याची दखल देशाच्या राष्ट्रपती कार्यालयाने घेतली असून मुंबई, नवी मुंबई, ठाणे महापालिकेसोबतच पनवेल महानगरपालिकेला देखील राष्ट्रपती पुरस्कारासाठी नामांकन जाहीर झाले आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. यावेळी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांचे विशेष कौतुक करताना रत्नाकर पाटील म्हणाले की, आयुक्त साहेब, आपण केलेल्या मौलिक कामगिरीमुळे पनवेलचे नाव देशपातळीवर निश्‍चितच उंचावले आहे. त्यामुळे समस्त पनवेलकरांचा ऊर अभिमानाने व स्वाभिमानाने भरून येत आहे, याचे श्रेय आपणास व आपल्या सर्व प्रशासन व  कर्मचारी वर्गास जात असल्याचे त्यांनी आवर्जून अभिनंदन करताना सांगितले. यावेळी पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार तथा दैनिक रायगड नगरीचे मुख्य संपादक सुनील पोतदार, ज्येष्ठ सल्लागार तथा दैनिक किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर, पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष तथा रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील, दैनिक लोकमतचे प्रतिनिधी तथा सचिव मयूर तांबडे, दैनिक रामप्रहरचे प्रतिनिधी तथा प्रसिद्धीप्रमुख नितीन देशमुख, दैनिक मुंबई चौफरचे प्रतिनिधी अरविंद पोतदार, दैनिक सामनाचे प्रतिनिधी संजय कदम, दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी के. सी.सिंग, दैनिक कृषिवलचे प्रतिनिधी राजेश डांगळे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image