केवल महाडिक यांचा राजे प्रतिष्ठानला रामराम, वैयक्तिक कारणासाठी दिला राजीनामा...
केवल महाडिक यांचा राजे प्रतिष्ठानला रामराम,
वैयक्तिक कारणासाठी दिला राजीनामा...
मजबूत केलेल्या संघटनेचा होऊ शकतो राजकारण्यांना फायदा...

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल / प्रतिनिधी : गेली तीन वर्षे छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक अध्यक्ष असलेल्या राजे प्रतिष्ठान या संस्थेमध्ये रायगड जिल्हाध्यक्ष, रायगड जिल्हा संघटक प्रमुख ते राजे प्रतिष्ठानच्या कामगार सेनेचे महाराष्ट्र सहसचिव पद भूषविलेले धडाडीचे समाजसेवक केवल महाडिक यांनी राजे प्रतिष्ठान कामगार सेना या संस्थेचा राजीनामा संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र ऊर्फ काकासाहेब खानविलकर तसेच चेंबूर कार्यालय येथे मेलद्वारे सुपूर्द केला.

ही विविध पदे भुषविताना संघटना मजबूत करून पनवेल, नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यात छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आणि राजे प्रतिष्ठान या नावाला उंचावर नेण्यात यश मिळाले. मात्र त्यांच्या या संघटनेचा येणाऱ्या पनवेल, नवी मुंबईतील निवडणुकांमध्ये राजकीय नेतेमंडळीना फायदा होऊ शकला असता, मात्र इतके मोठे पद आणि संघटना बांधल्यानंतर केवल महाडिक यांनी आपल्या पदाचा वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गेल्या तीन वर्षांमध्ये या संघटनेत अनेक तरुण मुले, व्यावसायिक लोकं जोडली गेली आहेत. आजही रायगडचे नेतृत्व करीत असताना रायगड जिल्ह्यातील संस्थेचे अनेक पदाधिकारी यांनी त्यांच्या राजीनाम्यानंतर आपले राजीनामे तयार ठेवले असल्याची चर्चा होत आहे. मात्र असे असले तरी केवल महाडिक यांची पुढची दिशा नेमकी काय असणार ? इकडे लक्ष देणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे. इतक्या प्रमाणात मोठी केलेली संघटना सोडून द्यायची म्हणजे कोणत्या पक्षाची जबाबदारी तर घेण्याच्या तयारीत महाडिक हे तयार नाही ना ? असा प्रश्न आता त्यांच्या मित्र परिवारात उपस्थित झाला आहे.
Comments