बंद दुकानातील घरफोडीत लाखोचा ऐवज लंपास...
बंद दुकानातील घरफोडीत लाखोचा ऐवज लंपास...
पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः पनवेल शहरातील एका बंद दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयाचा ऐवज चोरुन नेल्याने व्यापारी वर्गामध्ये भितीयुक्त वातावरण आहे.
मोहम्मद शहीद यांचे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पोलीस चौकीजवळ फर्स्ट चॉईस नावाचे होलसेल आणि रिटेलचे कपड्याचे व इतर साहित्याचे दुकान आहे. त्यांनी गल्ल्यामध्ये जवळपास 2 लाखाची रोख रक्कम ठेवली होती व दुकान बंद करून ते घरी गेले होते. सकाळच्या वेळेस ते घरी आले असता त्यांच्या दुकानाचे शटर उचकटल्याचे आढळले. आत प्रवेश करून अधिक तपास केला असता त्यांच्या गल्ल्यामध्ये ठेवलेले जवळपास 2 लाखापेक्षा जास्त रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे समजले. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


फोटो ः फर्स्ट चॉईस दुकान
Comments