वहाळ ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याचे श्री साई देवस्थान वहाळ चे संस्थापक रवींद्र पाटील यांनी केले स्वागत.....
वहाळ ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याचे श्री साई देवस्थान वहाळ चे संस्थापक रवींद्र पाटील यांनी केले  स्वागत.....

पनवेल / वार्ताहर : -  दरवर्षी प्रमाणे यंदाही वहाळ ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पायी दिंडीची सुरुवात शाळेतून, हनुमान मंदिरातून करण्यात आली. नंतर या पायी दिंडीचे श्री साई देवस्थान वहाळ येथे संस्थापक रवींद्र पाटील यांनी स्वागत केले. यावेळी दिंडीने मंदिरात दर्शन घेऊन पुढील प्रवासास मार्गस्थ केले. यावेळी साई देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पार्वती  पाटील, जगन पाटील आदी उपस्थित होते. 
यावेळी दिंडीतील भाविकांचे व दिंडीचे अध्यक्ष गोविंद महाराज व कार्याध्यक्ष महंत रामकृष्ण महाराज यांचे साई देवस्थान तर्फे स्वागत करण्यात आले. कोविड मुळे 2 वर्ष खंड पडलेल्या दिंडीने यंदा पुन्हा सुरुवात केली आहे. यावेळी भाविक भक्त मोठ्या उत्साहात दिंडीसाठी निघाले होते.

दरवर्षी प्रमाणे यंदाही वहाळ ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पायी दिंडीची सुरुवात शाळेतून, हनुमान मंदिरातून करण्यात आली. नंतर या पायी दिंडीचे श्री साई देवस्थान वहाळ येथे संस्थापक रवींद्र पाटील यांनी स्वागत केले. यावेळी दिंडीने मंदिरात दर्शन घेऊन पुढील प्रवासास मार्गस्थ केले. यावेळी साई देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पार्वती  पाटील, जगन पाटील आदी।उपस्थित होते. यावेळी दिंडीतील भाविकांचे व दिंडीचे अध्यक्ष गोविंद महाराज व कार्याध्यक्ष महंत रामकृष्ण महाराज यांचे साई देवस्थान तर्फे स्वागत करण्यात आले. कोविड मुळे 2 वर्ष खंड पडलेल्या दिंडीने यंदा पुन्हा सुरुवात केली आहे. यावेळी भाविक भक्त मोठ्या उत्साहात दिंडीसाठी निघाले होते.
Comments