महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जसखार ग्रामस्थांचा काँग्रेस पक्षात प्रवेश...
महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जसखार ग्रामस्थांचा काँग्रेस पक्षात प्रवेश...
       
पनवेल / वार्ताहर : - महेंद्रशेठ घरत यांनी रायगड जिल्हा कॉंग्रेसची सुत्रे हाती घेतल्यापासून रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. स्वतः महेंद्रशेठ घरत हे पायाला भिंगरी लावुन ज्या ठिकाणी दहा - दहा वर्ष कॉंग्रेसच्या बैठका झाल्या नाहीत त्या त्या ठिकाणी अगदी रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन बैठका घेत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षापासून दुर गेलेले सर्व कॉंग्रेसवासी घरवापसीच्या तयारीत आहेत. रायगड काँग्रेसला  महेंद्रशेठ घरत यांच्यासारखे खंबीर नेतृत्व मिळाल्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला गतवैभव प्राप्त होईल असे सगळीकडे बोलले जात आहे. त्यांच्या कार्यशैलीवर व नेतृत्वावर प्रभावित होवून जसखार मधील ग्रामस्थांनी शेलघर येथील सुखकर्ता निवासस्थानी महेंद्रशेठ घरत यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी हेमंत ठाकूर, प्रवीण ठाकूर, राजेश ठाकूर, निलेश तांडेल, संजीवनी मढवी, आतिश ठाकूर, केतन तांडेल, सुनील ठाकूर, रमेश ठाकूर, विकास ठाकूर, सुरेश पाटील, राजेश म्हात्रे, राजन ठाकूर, धिरज म्हात्रे, प्रथमेश ठाकूर, धिरज ठाकूर, दिपांशु  ठाकूर, आकाश ठाकूर, नरेश ठाकूर, हेमंत ठाकूर, शैलजा ठाकूर, नम्रता ठाकूर, नलिनी ठाकूर, पूजा मढवी, कामिनी म्हात्रे, अंकिता ठाकूर, कृतिका ठाकूर, निकिता भोईर, हेमंत पांडुरंग ठाकूर, वैष्णव ठाकूर, कुशल ठाकूर, निखील ठाकूर, यज्ञेश ठाकूर इत्यादींनी पक्षप्रवेश केला. 
          याप्रसंगी रायगड जिल्हाध्यक्ष श्री. महेंद्रशेठ घरत यांनी श्री. हेमंत यशवंत ठाकूर यांची जसखार गाव अध्यक्षपदी नियुक्ती केली.
Comments