तरूणी बेपत्ता....
तरूणी बेपत्ता....
पनवेल, दि.20 (वार्ताहर)- किरकोळ वादातून आई ओरडल्याने त्याचा राग मनात धरून एक तरूणी राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता घरातून निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.
           प्रिती उर्फ दिदि अश्विन कांबळे (रा.-उसर्ली गाव) उंची साधाराण 5 फूट, डोक्याचे केस काळे वाढलेले, अंगाने मजबूत, चेहरा गोल, रंग गहुवर्ण, कपाळ मोठे असून तिला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे. तिच्या अंगात सफेद रंगाचा टॉप व ग्रे रंगाची लेगिन्स घातलेली आहे. तसेच पायात प्लॅस्टिकची गुलाबी चप्पल आहे. या तरूणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे दुरध्वनी-27452333 किंवा पोलिस नाईक एम.एम. झिने यांच्याशी संपर्क साधावा.
          
फोटोः बेपत्ता प्रिती
Comments