केंद्रीय बंदरे ,नौकानयन आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत...
उरण : - (दिनेश पवार )
केंद्रीय बंदरे ,नौकानयन आणि जलमार्ग व आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ( जेएनपीटी ) येथे शनिवार ( दि. १३ ) रोजी भेट दिली .या वेळी जेएनपीटीचे ट्रस्टी तथा आमदार महेश बालदी यांनी शाल , पुष्पगुच्छ देवून स्वागत केले .
यावेळी भाजपा उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर , उरण नगरपरिषद उपनगराध्यक्ष जयविन कोळी ,भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह ,नगरसेवक राजेश ठाकूर , भाजपा वाहतूक सेल जिल्हा अध्यक्ष सुधिर घरत , उदयोजक राजेंद्र पडते ,कामगार नेते सुरेश पाटील ,आदी मान्यवर उपस्थित होते .