रस्ते अपघातातील मृत्यमुखींना मोटार ड्रायव्हिंग ओनर्स असोसिएशन, आर.टी.ओ पनवेल, रोटरी क्लब सेंट्रल तर्फे श्रद्धांजली अर्पण...
रस्ते अपघातातील मृत्यमुखींना मोटार ड्रायव्हिंग ओनर्स असोसिएशन, आर.टी.ओ पनवेल, रोटरी क्लब सेंट्रल तर्फे श्रद्धांजली अर्पण...
पनवेल / वार्ताहर : -  रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली म्हणून संपूर्ण जगभरात नोव्हेंबर महिन्याच्या तिसर्‍या रविवारी स्मरण दिवस साजरा करण्यात येतो त्यानिमित्ताने मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्सअसोसिएशन महाराष्ट्र, आरटीओ पनवेल, रोटरी क्लब पनवेल सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने कळंबोली सर्कल मुंबईचे प्रवेशद्वार येथे मृत्युमुखी पडलेल्याना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

त्यानिमित्ताने संघटनेचे अध्यक्ष राजू घाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे प्रवक्ते विवेक  खाडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात, कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील , नगरसेवक गणेश कडू , रोटरीचे माजी प्रांतपाल पनवेलचे विख्यात डॉक्टर डॉ.गिरीश गुणे, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे अध्यक्ष डॉ.अभय गुरसाळे सचिव संतोष घोडिंदे इतर रोटरीचे सदस्य, संघटनेचे कार्याध्यक्ष सुनीता चौहान, उप कार्याध्यक्ष भारती निलेश पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण महाकाळ, निलेश पाटील, आरटीओ पनवेलचे स.प्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश धोटे, मोटार वाहन निरीक्षक दिनेश बागुल, श्री खरचे,चंद्रकांत माने, ट्रॅफिकचे अधिकारी, ठाणे रीजन मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत सासे, सेक्रेटरी चंद्रकांत खामकर सदस्य सुबोध खरीवले सदस्य जितेंद्र हळदणकर ,पनवेल ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अयुब खान, बळीराम ठाकूर, अभिजित लगड, नरेंद्र रेड्डी, नंदकुमार साळुंखे, अमित गुप्ता, मुन्नाभाई, साई मिनेकर इत्यादी उपस्थित होते.
Comments