पनवेलच्या यश वनवेरू याची संतोष ट्रॉफी साठी निवड....
पनवेल, / दि. 21 (संजय कदम) - फुटबॉल प्रेमींसाठी महत्वाची अशी संतोष ट्रॉफी हि स्पर्धा असते. या स्पर्धेसाठी पनवेलमधील यश वनवेरू या युवा फुटबॉलपटूची निवड झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
यश वनवेरू हा रायगडमधून वर्षांनंतर निवडलेला पहिला खेळाडू आहे आणि तो पनवेलचा आहे. त्याच्या बरोबरच सिद्धार्थ कोलाको, मध्यभागी, अलझार दिल्लीवाला, बचावपटू, अद्वैत शिंदे, मिड फिल्डर सर्व नवी मुंबई यांची सुद्धा संतोष ट्रॉफी साठी निवड झाली आहे. हे सर्व जण महाराष्ट्रासाठी खेळत आहेत. यांचा पहिला सामना येत्या 3 डिसेंबर रोजी राजस्थान यांच्या बरोबर होणार असल्याने पनवेलसह रायगड वासी व नवी मुंबईकरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
फोटोः यश वनवेरू