१ लाखाची लाच स्विकारणारा महापालिका सेस-एलबीटी विभागातील लिपीक ऍन्टी करफ्शन ब्युरोच्या जाळ्यात....
१ लाखाची लाच स्विकारणारा महापालिका सेस-एलबीटी विभागातील लिपीक ऍन्टी करफ्शन ब्युरोच्या जाळ्यात....

पनवेल, दि.९ (वार्ताहर) ः महापालिकेच्या संगणकिय प्रणालीत कंपनीच्या करावर लावण्यात आलेल्या दंडाची व व्याजाची रक्कम निरंक दाखविण्यासाठी कंपनी मालकाकडे 3 लाख रुपये लाचेची मागणी करणाऱया व त्यातील 1 लाख रुपयांचा पहिला हफ्ता स्विकारणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या सेस-एलबीटी स्थानिक संस्था कर विभागातील लिपिक (कंत्राटी कामगार) विनायक पाटील याला नवी मुंबई ऍन्टी करफ्शन ब्युरोच्या पथकाने 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.  
यातील तक्रारदारांची खैरणे एमआयडीसीमध्ये कंपनी असून नवी मुंबई महापालिकेकडून आलेला सन 2013 ते 2016 या कालावधीतील सेस कर त्यांनी 2019 साली भरला होता. तक्रारदार यांनी 2013 ते 2016 या कालावधीतील सेस कर वेळेत न भरल्यामुळे त्यावर दंडाची रक्कम व व्याजाची रक्कम त्यांना भरावी लागणार असल्याची भिती सेस-एलबीटी विभागातील कर्मचारी विनायक पाटील यांनी दाखविली होती. तसेच कोपरखैरणे येथील सेस-एलबीटी विभागातील कार्यालयीन संगणकिय प्रणालीमध्ये त्यांच्या दंडाची रक्कम व व्याजाची रक्कम निरंक दाखविण्यासाठी लिपीक विनायक पाटील याने त्यांच्याकडे 3 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे कंपनी मालकाने नवी मुंबई ऍन्टी करफ्शन ब्युरोकडे तक्रार दाखल केली होती.  त्यानुसार अँन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने पडताळणी करुन सापळा लावला होता. त्यानंतर कंपनी मालकाने 3 लाख रुपये लाच देण्याचे कबुल करुन त्यातील 1 लाख रुपयांचा पहिला हफ्ता देण्याची तयारी दर्शविल्यानंतर सेस-एलबीटी विभागातील लिपीक विनायक पाटील याने कंपनी मालकाला सीबीडी बेलापुर मधील दिवाळे गाव येथील बिकानेर स्वीट मार्ट समोर लाचेची रक्कम घेऊन बोलावले होते. त्यानुसार सोमवारी दुपारी लाच घेऊन गेलेल्या कंपनी मालकाकडून लिपीक विनायक पाटील याने त्याच्या कारमध्ये 1 लाख रुपयांची रक्कम स्विकारल्यानंतर अँन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. सदरची कारवाई नवी मुंबई ऍन्टी करफ्शन ब्युरोच्या पोलीस उपअधिक्षक ज्योती देशमुख व त्यांच्या पथकाने केली.  
चौकट  
मसाज पार्लरमधील फर्निचर पार्टेशनवर कोणत्याही प्रकारची अतिक्रमण कारवाई न करण्यासाठी मसाज पार्लर व्यावसायिकाकडे 24 हजार रुपये लाचेची मागणी करणाऱया नवी मुंबई महापालिकेच्या बेलापूर विभाग कार्यालयातील माहिती/नोंदणीकर लिपिक राकेश हिरालाल गेटमे (38) व कनिष्ठ अभियंता (कंत्राटी कामगार) विजय प्रकाश लावंड (31) या दोन कर्मचाऱयांविरोधात नवी मुंबई अँटी करपशन युनिटने गत आठवडयात कारवाई करुन गुन्हा दाखल केला आहे. त्यापाठोपाठ महापालिकेच्या एलबीटी सेस विभागातील लिपीक विनायक पाटील हा कंत्राटी कामगार अँटी करपशन ब्यूरोच्या जाळ्यात सापडल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Comments