गव्हाण- न्हावा एस.टी, गव्हाण फाटा मार्गे जाण्याचा प्रश्न महेंद्र घरत यांच्या अथक प्रयत्नांतून मार्गी लागणार ...
गव्हाण – न्हावा एस.टी, गव्हाण फाटा मार्गे जाण्याचा प्रश्न महेंद्र घरत यांच्या अथक प्रयत्नांतून मार्गी लागणार ...
     
पनवेल : -  सिडको महामंडळाच्या विमानतळ बाधीत प्रकाल्पग्रस्थांच्या पुनर्वसनासाठी सिडको  महामंडळाने उलवे नोड विकसित करताना गव्हाणफाटा – गव्हाण हा मार्ग २०१८ पासून बंद केला यावेळी गव्हाण - न्हावा शेलघर, जावळे, बामनडोंगरी, कोपर येथील रहिवाशांनी याला प्रचंड विरोध केला. त्यावेळी तत्कालीन सिडको व्यवस्थापकीय संचालक भूषण  गगराणी , राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प अधिकारी  प्रशांत फेगडे यांच्या बरोबर कामगार नेते महेंद्र घरत यांनी बैठक करून गव्हाण फाटा - गव्हाण मार्ग हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे व प्रवाशी उलवे नोड ( वहाळ गावाजवळ ) जाऊन, उलवे नोडचा फेर फटका मारल्यामुळे वेळ आणि इंधनाचा खर्च नाहक वाढत आहे, त्यामुळे आम्हाला आहे तोच मार्ग  ठेवावा यावर NHAI चे प्रकल्प संचालक प्रशांत फेगडे यांनी सांगितले की यासाठी महामार्गाला टनेल (भूयार) निर्माण करावा लागेल, तो सुद्धा एस.टी. बसेस जातील, जोपर्यंत ते अश्वासन देत नाहीत तोपर्यंत जुना रस्ता आम्ही तोडून देणार नाही. शेवटी आश्वासन दिल्यानंतर जुना रस्ता नोडल विकासामध्ये तोडण्यात आला, यानंतर कास्टिंग यार्ड नवीन मार्गात येत असल्यामुळे ३ वर्षे प्रवासी वाहतूक बंद राहिली परंतु महेंद्र घरत यांनी गेली ३ वर्षे न थकता सातत्याने पाठपुरावा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक कार्यालय व सिडको कार्यालय यांचा पाठपुरावा केला व गव्हाण फाटा येथे महामार्गाला टनेल ( भुयाराचे ) काम पूर्ण करून घेतले व पुढील जोडरस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालकांनी निधी उपलब्ध होत नसल्याचे सांगितले. महेंद्र घरत यांनी हार न मानता जनतेला दिलेले अश्वासन पूर्ण होण्याच्या दृष्टीने सिडकोचे आत्ताचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेऊन सर्व परिस्थिती सांगितले व किमान १०००० प्रवाशांची गैरसोय होत आहे. एस.टी. मार्ग बंद झाल्यामुळे गव्हाणविभागातील जनतेच्या भावनातीव्र असल्याचे  सांगितले यावर तत्काळ डॉ. संजय मुखर्जी यांनी मुख्य अभियंता श्री. दाएरकर तांना बोलावून पाच कोटीचे निधी मंजूर करून दिला व आत त्यांचे शॉर्ट नोटीसने टेंडर काढले लवकरच पावसाळ्यापूर्वी हा भुयार व रस्ता मार्गी लागणार व बहुप्रतिक्षित हा गव्हाण फाटा – गव्हाण रस्ता मार्गी लागणार आहे.
      महेंद्र घरत यांच्या अथक प्रयत्नाने व जिद्दीने शेवटी गव्हाण – न्हावा प्रवाशांचा उलवे नोड मार्गे हेलपाटा वाचणार. गव्हाण विभागातील सर्व गावे २४/७ वीजेने सिडकोमार्फत जोडण्यात यशस्वी झालेले आहेत व पिण्याच्या पाण्याची समस्याही लवकरच सिडको मार्फत – सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा महेंद्र घरत यांचा प्रयत्न आहे.
Comments