नगरसेवक विकास घरत यांच्या प्रयत्नामुळे कामोठे से.-34 येथील प्लॉटचा प्रश्न निघाला निकाली...
नगरसेवक विकास घरत यांच्या प्रयत्नामुळे कामोठे से.-34 येथील प्लॉटचा प्रश्न निघाला निकाली
पनवेल दि.28 (संजय कदम)- कामोठे वसाहतमधील से.-34 याठिकाणी असलेला एक प्लॉट घनदाट झाडी झुडपांमुळे वापरात नव्हता. याबाबत स्थानिक नगरसेवक विकास घरत यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न निकाली काढला आहे. सदर प्लॉटची स्वच्छता करून तो आता ज्येष्ठ नागरिकांसह मुलांना फिरणे, खेळण्यासाठी मोकळा झाला आहे. तसेच त्या प्लॉटच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आल्याने आगामी काळात एक चांगली सावली या भागाला मिळणार आहे. 
           से.-34 याठिकाणी असलेल्या या प्लॉटवर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होती व या प्लॉटचा उकिरडा झाला होता. त्यामुळे डास व इतर साथीच्या रोगांचा फैलाव होत होता. या संदर्भात सन 2016 पासून स्थानिक नागरिकांनी केलेल्या मागणीच्या आधारे स्थानिक नगरसेवक विकास घरत हे सातत्याने पाठपुरावा करीत होते. अखेरीस आज हा प्लॉट स्वच्छ करून त्याठिकाणी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले. व आबाल वृद्धांसाठी फिरणे, खेळण्यासाठी हा प्लॉट मोकळा करून घेण्यात आला. याबद्दल स्थानिक रहिवाश्यांनी नगरसेवक विकास घरत यांचे आभार मानले आहेत.
         

फोटोः नगरसेवक विकास घरत यांच्या माध्यमातून करण्यात येत असलेले वृक्षारोपण
Comments