तळोजा येथील आर.ए.एफ कॅम्प मध्ये पोलीस स्मृती दिनानिमित्त शहिदांना श्रद्धांजली....
तळोजा येथील आर.ए.एफ कॅम्प मध्ये पोलीस स्मृती दिनानिमित्त शहिदांना श्रद्धांजली.... 

पनवेल / (वार्ताहर) : -. तळोजा येथील आरएएफ कॅम्पमध्ये पोलीस स्मृती दिनानिमित्त केंद्रीय राखीव पोलीस दल आणि रॅपीड ऍक्शन फोर्सच्या वतीने अमर शहिदांना मानवंदना देऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दल व रॅपीड ऍक्शन फोर्सचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात देखील पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी शहिदांना मानवंदना देऊन श्रद्धांजली अर्पण केली.   
२१ ऑक्टोबर १९५९ रोजी चीनच्या सीमेचे रक्षण करताना आपले प्राण गमावलेल्या दहा शूर सैनिकांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ देशातील सर्व केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पोलीस दलांद्वारे प्रत्येक वर्षी २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतिदिन पाळण्यात येतो. याच निमित्ताने गुरुवारी तळोजा येथील केंद्रीय राखीव दल आणि १०२ रॅपीड ऍक्शन फोर्सच्या संयुक्त विद्यमाने तळोजा येथील रॅपीड अँक्शन फोर्सच्या कॅम्पमध्ये आयोजित कार्यक्रमात वेस्टर्न सेक्टरचे पोलीस महानिरीक्षक रणदीप दत्ता यांनी पोलीस स्मृती दिनाच्या इतिहासावर प्रकाश टाकला. तसेच अमर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतानाच त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचे आवाहन उपस्थितांना केले.  
या कार्यादरम्यान उप महानिरीक्षक चंद्र भूषण, पी.सी. झा, बी.एस. सिद्धू कमांडेंट, कमांडेंट (पीएमजी) राजेश कुमार यांच्यासह पश्चिम क्षेत्र मुख्यालय आणि १०२ रॅपिड ऍक्शन फोर्सचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी देखील पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस स्मृती दिना निमित्त शहिदांना मानवंदना देऊन श्रद्धांजली अपर्ण केली. यावेळी पोलीस आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ अधिकारीवर्ग उपस्थित होता.
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image